चाहत्याला जीवे मारण्याचा आरोप, कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याला जामीन मंजूर

हत्या प्रकरणात तुरुंगात असलेला कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याला जामिन मंजूर झाला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने दर्शनला 6 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. दर्शनला कर्नाटक पोलिसांनी जूनमध्ये एका खुनाच्या प्रकरणात अटक केली होती. दर्शनाला यापूर्वी बेंगळुरू तुरुंगात ठेवण्यात आले होते. पण तुरुंगात V.I.P ट्रीटमेट घेतल्याच्या आरोपानंतर त्याला बल्लारी कारागृहात हलवण्यात आले होते.

दर्शन थुगुडेपा यांनी मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी कर्नाटक उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने या प्रकरणी प्रशासनाला वैद्यकीय तपासणी अहवाल सादर करण्यास सांगितले होते. पाठीच्या समस्येसाठी दर्शनला फिजिओथेरपी किंवा शस्त्रक्रिया करावी लागू शकते, असे अहवालात म्हटले आहे. त्यानंतर वैद्यकीय कारणास्तव न्यायालयाने दर्शनला 6 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

नेमक प्रकरण काय?

रेणुका स्वामी (33) ऑटो चालकाचे 9 जून रोजी अपहरण करण्यात आले होते. त्याच्यावर अत्याचार केल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. हे सर्व कन्नड चित्रपट स्टार दर्शनच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप आहे. दर्शनाची जोडीदार मानली जाणारी अभिनेत्री पवित्रा गौडा हिला रेणुका स्वामीने अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप होता. रेणुका स्वामी आणि अभिनेत्री पवित्रा गौडा यांच्या झालेल्या भांडणात दर्शनाचाच सहभाग असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे.