महाविकास आघाडीचे कलिना विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवसेना आमदार संजय पोतनीस यांच्या प्रचारार्थ आज महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा दणदणीत मेळावा सांताक्रूझच्या पाठक टेक्निकल हायस्कूल येथे पार पडला. मेळाव्यात निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय मोलाचे मार्गदर्शन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. या मेळाव्यासाठी मोठय़ा संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या मेळाव्यासाठी शिवसेना नेते, आमदार अनिल परब, शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱयावर आत्मविश्वास दिसत होता. कलिना विधानसभेत पुन्हा शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणणार, असा निर्धार आज मेळाव्यात करण्यात आला. मेळाव्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष भालेराव, महिला मुंबई अध्यक्ष अनिशा बागुल, मुंबईच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष एम. ए. मतिन शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे हरीश सणस, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे, मुंबई उपाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, माजी नगरसेवक आणि खेरवाडी विधानसभा संघटक सदा परब आदी उपस्थित होते. शिवसेना विभागप्रमुख डॉ. महेश पेडणेकर यांनी सूत्रसंचालन केले.