हे बेरोजगार तरुणांच्या भवितव्याशी खेळण्यासारखं आहे, कैलास पाटील यांची मिंधे सरकारवर टीका

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 2023 भरतीतील उप अवेक्षक पदाची परिक्षा 24 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल अद्यापही लागलेला नाही. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी मिंधे भाजप सरकारला फटकारले आहे.

कैलास पाटील यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून सरकारने सरकारी नोकरीची आस लावून बसलेल्या तरुणांना न्याय द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. ”पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 2023 भरतीतील उप अवेक्षक पदाची परिक्षा 24 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल अद्यापही लागलेला नाही. एकीकडे बेरोजगार तरुण निकालाच्या प्रतीक्षेत असताना त्यांना अशा प्रकारे सहा-सहा महिने ताटकळत ठेवणं म्हणजे त्यांच्या भवितव्याशी खेळण्यासारखं आहे. इव्हेंटबाज सरकारने आपल्या इव्हेंटबाजितून थोडा वेळ काढून या परीक्षेचा निकाल जाहीर करावा आणि सरकारी नोकरीची आस लावून बसलेल्या तरुणांना न्याय द्यावा, अशी पोस्ट कैलास पाटील यांनी शेअर केली आहे.