ज्युनियर मेहमूद यांची प्रकृती चिंताजनक

बॉलीवूडमधील प्रसिद्ध विनोदी अभिनेते ज्युनियर मेहमूद यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोटाच्या कर्करोगाने ग्रासलेल्या ज्युनियर मेहमूद यांचे शरीर खूप अशक्त झाल्याने डॉक्टरांनी केमोथेरपीस नकार दिला आहे. त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आल्याचे वृत्त आहे. अभिनेते जॉनी लिव्हर यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.