हिंदुस्थानचा नेमबाज अंतिम फेरित उशीरा पोहोचला, दोन पॉईण्ट कमी केल्याने सुवर्णपदक हुकले

हिंदुस्थानच्या एका नेमबाजाला प्रशिक्षणाला उशीरा पोहोचल्याने भुर्दंड सहन करावा लागला आहे. पेरुच्या लीमा येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनिअर नेमबाजी चॅम्पिअनशीपमध्ये शनिवारी 10 मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम फेरित  सराव क्षेत्रात नेमबाज उशीरा पोहोचल्याने त्याला दोन पॉईण्टचा दंड ठोठावला. दोन पॉईण्ट कमी केल्याने नेमबाजाचे सूवर्णपदकही हुकले.

आंतरराष्ट्रीय नेमबाज महासंघा (आयएसएसएफ) ने शनिवारी 20 वर्षीय नेमबाज उमेश चौधरी याने नियमाचे उल्लंघन केल्यामुळे दोन पॉईण्टचा दंड ठोठावला आहे. दरम्यान हिंदुस्थानचे 60 सदस्यीय दलामध्ये सहभागी प्रशिक्षक आणि सहाय्यक स्टाफ यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उमेश चौधरी याला अंतिम सामन्यात त्याच्या पहिल्या शॉटमध्ये दोन पॉईण्ट कमी केल्यानंतर 7.4 पॉईण्ट्स मिळाले. हिंदुस्थानी राष्ट्रीय रायफल संघाचे सचिव राजीव भाटीया यांना ज्यावेळी याबाबत विचारले, त्यावेळी ते म्हणाले की, त्यांना या घटनेबाबात कोणतीही माहिती नाही. त्यामुळे ते यावर कोणतही भाष्य करणार नाहीत. उमेश चौधरी पात्रता फेरित 580 गुणांची कमाई करत तिसऱ्या स्थानावर होता आणि जर त्याच्यावर दोन पॉईण्टचा दंड ठोठावला नसता, तर तो आठ नेमबाजांच्या अंतिम खेळात सुवर्ण पदक जिंकू शकला असता. दंड आकारल्याने चौधरी पदकापासून सहाव्या स्थानावर गेला.

भाटीया यांना सांगण्यात आले की, दंडाचे तपशील आयएसएसएफच्या संकेतस्थळावरही आहे. त्यावर ते म्हणाले, तो कदाचित तिथे वेळेत सराव क्षेत्रात पोहोचला नसावा. मला माहित नाही तो का आणि कशासाठी उशीरा पोहोचला. मला तिथे उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यायला हवी अशी प्रतिक्रिया भाटीया यांनी दिली.

प्रशिक्षकांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे का, असे विचारले असता ते म्हणाले, ‘मी यावर काहीही बोलणार नाही कारण आम्हाला काहीही सांगण्यात आलेले नाही. मला त्यावर चर्चा करायची नाही. असे पहिल्यांदाच घडले असे नाही. फक्त प्रशिक्षक जबाबदार आहेत आणि नेमबाजांची जबाबदारी नाही असे तुम्हाला वाटते का? त्यांना नियमांची माहिती असावी. अखेर तो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत आहे.