तुम्ही जागा द्या, परवानगी द्या, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करून दाखवतो, असे प्रतिआव्हान कळवा-मुंब्रा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी आज भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना दिले. ऐन निवडणुकीत फडणवीस हे वादग्रस्त वक्तव्ये करीत भाषणे ठोकून मुंब्य्राला नाहक बदनाम करीत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले की, मुस्लिमांना कायम वाईट नजरेने पहायचे ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नाही. त्यांच्यासोबत दिल्लीतील औरंगजेबाच्या दरबारात गेलेला मदारी मेहतर हादेखील मुस्लिमच होता. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये असे आव्हाड म्हणाले.