उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निकालात हेराफेरी आणि गोलमाल झाल्याचे अनेक पुरावे समोर आले असून शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन त्यावर बोट ठेवत या संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले व ही लढाई शिवसेना कोर्टात लढणार असे जाहीर केले आहे. दरम्यान या प्रकरणाच्या तपासासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथक स्थापन करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
”माझ्या माहितीनुसार प्रत्येक रिटर्निंग ऑफिसर (RO) ला एक विशेष मोबाईल मिळतो. त्या मोबाईलवर ईव्हीएम आणि डेटाचा OTP येतो. हा फोन फक्त रिटर्निंग अधिाऱ्यासाठी असतो. असे असताना तो मोबाईल वायकर यांच्या नातेवाईकांच्या हाती कसा गेला. रिटर्निंग ऑफिसर सूर्यवंशी या त्यांच्या राजकीय संपर्कासाठी ओळखल्या जातात. पोलीस खात्यात राजकीय हस्तक्षेप चव्हाट्यावर असताना मोबाईलवर कोणताही डेटा उपलब्ध असण्याची शक्यता आहे का, याबाबत मला शंका आहे.
उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करावे. सध्या देशाच्या लोकशाहीला धोका आहे. हे प्रकरण पेंडोरा बॉक्स आणि ईव्हीएम फेरफारचे सत्य उघडू शकते, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.