Jio Down : देशभरात जियोचे नेटवर्क डाऊन, युजर्संना झाला मोठा मनस्ताप

संपूर्ण देशात जियोचे नेटवर्क डाऊन झाले आहे. त्यामुळे युजर्संना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. अनेक ठिकाणी इंटरनेटला रेंज नाही तर अनेक ठिकाणी मोबाईलला नेटवर्कच नव्हते. त्यामुळे संतापलेल्या जियो युजर्संनी एक्सवर तक्रारींचा पाढा वाचला आहे.

डाऊन डिटेक्टर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार जियोकडे नेटवर्क एररच्या १० हजार ३६७ तक्रारी आल्या आहेत. यातल्या सर्वाधिक तक्रारी या सिग्नल मिळत नसल्याच्या होत्या. त्यानंतर मोबाईल इंटरनेट आणि जियो फायबरच्याही जियोकडे तक्रारी आल्या होत्या. पण याच वेळी एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएलमध्ये कुठलीच तांत्रिक अडचण नव्हती.

 

जियो नेटवर्कमध्य तांत्रिक अडचण असल्याने अनेक युजर्सनी एक्सवर तक्रारी केल्या आहेत. अनेक युजर्संनी फोन न लागणे, इंटरनेट नसणे, मेसेज पाठवता येत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. युजर्संनी JioDown हा हॅशटॅग वापरून आपली गाऱ्हाणी मांडली आहे.