झारखंडमध्ये सीबीआयचा छापा

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या 8 दिवस आधी मंगळवारी सकाळी 11 वाजता सीबीआयने अनेक ठिकाणी छापेमारी केली. 1200 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर खाण प्रकरणात झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये 16 ठिकाणी छापे टाकण्यात आले. झारखंड, साहिबगंड, पाकूर, राजमहल या तीन जिह्यांमध्ये छापेमारी सुरू करण्यात आली. कोलकाता आणि पाटणा येथेही पथक तपास करत असून एएनआयने दिलेल्या माहितीनुसार सीबीआयने छापेमारीत वेगवेगळय़ा ठिकाणांहून 60 लाख रुपये रोख, एक किलो सोने आणि 1.25 किलो चांदी जप्त करण्यात आली.