सातारा शिवसैनिकांच्या इशाऱ्यानंतर रुग्णालयाने रुग्णाचे बिल केले माफ

‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’त रुग्णालय समाविष्ट असतानाही रुग्णावर खासगी स्करूपात उपचार करून तीन लाखांचे बिल आकारण्यात आले. त्यामुळे नातेवाइकांनी सोने गहाण ठेवून पैसे आणले; याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱयांना समजताच, त्यांनी रुग्णालयात धाव घेत ‘शिवसेना स्टाइल’ने इशारा देताच रुग्णालयाने बिल माफ केले.

जावली तालुक्यातील एकजण हृदयरोगाने आजारी होता. संबंधितावर साताऱयातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही तासांतच 80 हजारांचे बिल झाले. त्यानंतर दुसऱया रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेले. संबंधित रुग्णालय महात्मा फुले योजनेत समाविष्ट होते. तरीही खासगी उपचार करून तीन लाखांपर्यंत बिल आकारले. त्यातच सुरुवातीला 65 हजार भरले होते. उर्करित सक्का दोन लाखांचे बिल देण्यासाठी नातेवाईकांनी दागिने गहाण ठेवून पैसे आणले होते.

याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱयांना माहिती मिळताच, त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, व्यवस्थापनाने चुकीची उत्तरे दिली. त्यामुळे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्कात महात्मा फुले योजना कार्यालयासमोर शिवसैनिकांनी ठिय्या दिला. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज वरपे आले. त्यांनीही रुग्णालय प्रशासनाला खडेबोल सुनावले. यादरम्यान रुग्णालयाने सामंजस्याची भूमिका घेत सर्व बिल माफ करण्यास भाग पाडले. जावली तालुकाप्रमुख नितीन गोळे, सातारा तालुकाप्रमुख सागर रायते, सुनील पवार, प्रणव साकंत, शिवराज टोणपे, रवींद्र भणगे, इम्रान बागवान, प्रशांत शेळके, हरी पवार, उमेश दुर्गावळे, रवि पार्टे, अमोल गोसावी, बापू गोळे यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’त गैरप्रकार करणाऱयांना धडा शिकवू तसेच योजना सुरू झाल्यापासून जिह्यात किती जणांवर उपचार केले, याची यादी मागणार आहे. त्यातून खरे रुग्ण समोर येतील, असे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी सांगितले.