जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांची चकमक, एक जवान शहीद

जम्मू कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांची चकमक सुरू आहे. या चकमकीत सैन्याचा एक जवान शहीद झाला असून एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं आहे. अद्याप ही चकमक सुरू आहे. राजौरीच्या उपजिल्हा कालाकोट येथील बांबूच्या जंगलात ही चकमक झडत आहे.

दोन्हीकडून बंदुकीच्या फैरी झडत आहेत. राजौरी येथे काही दिवसांपूर्वी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी सुरक्षादलांनी दहशतवाद्यांची घुसखोरी मोडून काढली होती. त्यांनी पूंछ येथे सीमेपलिकडून हिंदुस्थानी सीमेत दाखल होणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ठार केलं होतं.