
जम्मू-कश्मीरमधील राजौरी येथे आज दुपारी लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला. सुंदरबनी परिसरात दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले. हल्ल्यानंतर लगेचच लष्कराने दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम उघडत परिसराला घेराव घातला. सुंदरबनीच्या जंगलात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कराच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली आहे. हल्ल्यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
n नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांकडून लष्करी वाहनावर काही राऊंड झाडण्यात आले. त्यानंतर हे वाहन झाडाला धडकले. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला लष्कराच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दहशतवादी काही राऊंड फायर करून घनदाट जंगलाच्या दिशेने पळून गेले. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा अखनुर सेक्टरजवळ किरी बट्टल परिसरात नियंत्रण रेषेजवळ काही संशयास्पद हालचाली दिसल्याने लष्कराच्या जवानांकडून त्या दिशेने गोळीबार करण्यात आल्याचे लष्कराच्या अधिकाऱयांनी सांगितले.