कठुआ हल्ल्यातील चार दहशतवाद्यांचे स्केच जारी; माहिती देणाऱ्यास 20 लाखांचे बक्षीस

जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी कठुआ जिल्ह्यातील डोंगराळ भागात दिसलेल्या चार दहशतवाद्यांचे स्केचेस जारी केले आहे. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी विश्वासार्ह माहिती देणाऱ्यास 20 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

 कठुआ जिल्ह्यात 8 जुलै रोजी माचेडी भागात हिंदुस्थानी लष्काराच्या ताफ्यावर झालेल्या प्राणघातकी हल्ल्यात कनिष्ठ आयोग अधिकाऱ्यासह पाच जवान शहीद झाले होते. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित काश्मीर टायगर्स ग्रुपने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. यानंतर मोठ्या प्रमाणात शोधमोहीम केल्यानंतरही, काश्मीर टायगर्सचे देशात घुसलेले दहशतवादी सापडले नाहीत.

आता कठुआ पोलिसांनी या दहशतवाद्यांची स्केचेस X वर शेअर केली आहेत. या स्केचेस सह कठुआ जिल्ह्याच्या डोंगराळ भागातील मल्हार, बानी आणि सेओजधर जंगलातील मातीच्या घरांमध्ये शेवटतचे पाहिले गेले होते. यांची विश्वासार्ह माहिती देणाऱ्यास प्रत्येक दहशतवाद्यावर 5 लाखांचे बक्षीस दिले जाईल, असे या पोस्टमध्ये जाहीर करण्यात आले आहे.