जम्मू – कश्मीर आणि हरयाणाचा आज फैसला

जम्मू-कश्मीर आणि हरियाणात कोणाचे सरकार येणार याचा फैसला आज होणार आहे. मतदानानंतरच्या एक्झिट पोलमध्ये हरयाणात भाजपची सत्ता जाऊन काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळवेल, असा अंदाज बांधण्यात आला असून जम्मू-कश्मीरात इंडिया आघाडी बहुमताच्या जवळ जाईल, अशी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर या पहिल्याच निवडणुका होत असून या निकालांकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हरयाणात गेल्या 10 वर्षांपासून काँग्रेसला सत्तेबाहेर राहावे लागले आहे.

– जम्मू-कश्मीरमधील मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
– एक्झिट पोलनुसार त्रिशंकू स्थिती झाल्यास मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोव्रॅटिक पार्टीची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
– महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक पुढच्या महिन्यात होणार आहे. त्यामुळे या दोन राज्यांचे कौल महत्त्वाचे ठरणार आहेत.