आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. जगनमोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला येत्या 4 जानेवारीला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
वायएस शर्मिला व जगनमोहन रेड्डी यांचे वडील वायएसआर रेड्डी वडील हे आंध्र प्रदेशचे दोनदा मुख्यमंत्री राहिले होते. सप्टेंबर 2009 ते हेलिक़ॉप्टरने एका दौऱ्यावर जात असताना खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. रेड्डी यांची आंध्र प्रदेशमध्ये प्रचंड लोकप्रियता होती. त्यांच्या मृत्यूच्या धक्क्याने आंध्र प्रदेशमधील तब्बल 122 जणांचा मृत्यू झाला होता. काहींनी आत्महत्या केल्या होत्या तर काहींचा धक्क्याने मृत्यू झाल्याचे बोलले जाते.
2012 साली जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेसला राम-राम ठोकत युवाजना श्रमिका रायथू काँग्रेस पक्षाची ( वायएसआरसीपी ) स्थापना केली होती.