भ्रष्टाचार आणि फोडाफोडीची करून लफडी, महायुतीची झाली जाडी चामडी! काँग्रेसने लॉन्च केलं नवीन गाणे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने एक नवीन गाणे लॉन्च केले आहे. हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या गीताद्वारे काँग्रेसने महायुतीच्या भ्रष्ट कारभारावर निशाणा साधला आहे. ‘भ्रष्टाचार आणि फोडाफोडीची करून लफडी, महायुतीची झाली जाडी चामडी’, असे या गाण्याचे बोल आहेत.

हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी थांबल्यानंतर आता काँग्रेसने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस-पवार या महायुतीला घेरण्याची तयारी सुरू केली असून याच अनुषंगाने एक गाणे लॉन्च करण्यात आले आहे. या गाण्यात बेरोजगारी, महिलांवरील गुन्हे आणि उद्योगांचे पलायन या प्रमुख मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून या गाण्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. महायुतीच्या महान अपयशानंतर सादर करीत आहोत, जाडी चामडी चमकते युतीची लका लका, असे कॅप्शन याला देण्यात आले आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही हे गाणे शेअर केले आहे.