जॅकलिनला पुन्हा ईडीचे समन्स 

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवले आहे. सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या मनी मनलाँडरिंग प्रकरणात जॅकलिनचे नाव जोडले असून ईडीने तिची याआधीही चौकशी केली होती. या प्रकरणात पुन्हा जॅकलिनची चौकशी करण्यात येणार आहे. जॅकलिन फर्नांडिस या प्रकरणात 9 वर्षांपासून अडकली आहे. मात्र, गेल्या 2 ते 3 वर्षांपासून ती ईडी आणि न्यायालयाच्या फेऱया मारत आहे. चंद्रशेखरने फसवणूक करून मिळवलेल्या या पैशाचा वापर जॅकलिनसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी केल्याचा आरोप आहे.