आपल्याकडे ट्रेन लेट होणे हा प्रकार काही नवीन नाही. ट्रेन अर्धा-एक तास उशिरा येणे सामान्य आहे. मात्र तीन तास ट्रेनला उशीर झाला तर आपली कामे बिघडतात. एका प्रवाशाने ही गोष्ट गंभीरपणे घेतली आणि रेल्वे प्रशासनला कोर्टात खेचले. तीन वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला आणि रेल्वेला 7 हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
जबलपूरमधील अरुण कुमार जैन हे 11 मार्च 2022 रोजी दिल्लीला जाण्यासाठी हजरत निजामुद्दीन असा प्रवास करत होते. परंतु त्यांना रेल्वेमुळे योग्य वेळी पोहोचणे शक्य झाले नाही. रेल्वेच्या गलथान कारभाराविरोधात जैन यांनी कोर्टात धाव घेतली. ग्राहक तक्रार मंचाने रेल्वेला 7 हजार रुपयांचा दंड ठोठावला. यामध्ये 803.60 रुपये तिकिटाचा रिफंड मिळाला. 5 हजार रुपये मानसिक त्रास आणि खटल्यासाठी लागलेला खर्च 2 हजार रुपये याचा समावेश होता. रेल्वेने 45 दिवसांच्या आत हा दंड दिला नाही तर वार्षिक 9 टक्के व्याजाने रक्कम भरावी लागणार आहे.