हिजबुल्लाहच्या उत्तराधिकाऱ्याचा खात्मा, इस्त्रायलने हवाई हल्ला करत केला मोठा दावा

हिजबुल्लाहचा म्होरक्या हसन नसरल्लाह याच्या मृत्यूनंतर त्याचा वारिस हासिम सफीद्दीन याला हिजबुल्लाहचा नवा उत्तराधिकारी म्हणून निवडण्यात येणार होते. मात्र, त्याआधीच इस्त्रायलने त्याचाही खात्मा केल्याचा दावा केला आहे.

लेबनॉनच्या बेरुत येथे इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा उत्तराधिकारी हाशिम सफीद्दीन याचा खात्मा करण्यात आला आहे. इस्त्रायली सेनेने या घटनेचा दावा केला आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार इस्त्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, सफिद्दीन बुधवारी बेरुतच्या बंकरमध्ये होता. ज्यावर इस्त्रायलने हवाई हल्ला केला.

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सफीद्दीन मारला गेल्याचे इस्त्रायलच्या माध्यमांनी लेबनॉनच्या अधिकाऱ्यांचा दाखला देत वृत्त दिले आहे. पण हाशिम सफीद्दीन मारला गेला. इतर कोणत्याही रिपोर्टमध्ये आतापर्यंत स्पष्ट झालेले नाही. मात्र, इस्त्रायलच्या लष्कराने दावा केला आहे की, सफीद्दीन हवाई हल्ल्यात मारला गेला.

हाशिम सफिद्दीला 2017 मध्ये अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केले होते. तो हिजबुल्लाहमधील नंबर 2 चा दहशतवादी होता. इतकंच नाही तर हाशिम स्वतःला पैगंबर मोहम्मदचा वंशज म्हणायचा. इस्रायलने आठवड्याभरापूर्वीच हिजबुल्लाचा म्होरक्या हसन नसराल्लाहचा खात्मा केला होता. ज्यानंतर हाशिमला हिजबुल्लाचा नवा प्रमुख बनवण्यात येणार होते. इराण आपल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असताना सफीद्दीनवर हा हल्ला झाला आहे.