जगभरातून थोडक्यात बातम्या

इस्रायलमध्ये कट्टर ज्यूंसाठी लष्करी सेवा अनिवार्य
इस्रायलमधील कट्टर ज्यूंना यापुढे अन्य नागरिकांप्रमाणे लष्करी सेवा बजावणे अनिवार्य असेल असा महत्त्वपूर्ण निकाल तेथील सुप्रीम कोर्टाने दिला आहे. अल्ट्रा ऑर्थॉडॉक्स (कट्टर) ज्यू सेमिनरी (धार्मिक) विद्यार्थ्यांना लष्करी सेवा बजावण्यासाङ्गी शासनाने कायद्याचा मसुदा तयार करावा, असे आदेश न्यायालयाने दिले. या निर्णयामुळे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची डोकेदुखी वाढणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल गोंधळात टाकणारा आहे, अशी प्रतिक्रिया नेतान्याहू प्रतिनिधित्व करत असलेल्या लिकुड पार्टीने दिली आहे. नेतान्याहू यांचे आघाडी सरकार दोन कट्टर ज्यूवादी पक्षांच्या पाङ्गिंब्यावर टिकलेले आहे. पाठिंब्यासाठी कट्टर ज्यू विद्यार्थ्यांना सैन्यभरतीतून सवलत कायम राहायला हवी अशी त्यांची अट आहे. या दोन पक्षांच्या नेत्यांनी न्यायालयाच्या निकालाबद्दल निराशा व्यक्त केली. इस्रायलचे सैन्य सध्या गाझामध्ये हमास आणि लेबनॉनमध्ये हेजबोला या दोन बंडखोर संघटनांबरोबर युद्ध करत आहे. एकाच वेळी अनेक आघाडय़ांवर सुरू असलेल्या युद्धांमुळे इस्रायलचे सैन्यावरील तणाव वाढला आहे. इस्रायली कायद्यानुसार, तेथील तरुणांना
वय वर्षे 18 पासून 24 ते 32 महिने सैन्यामध्ये भरती होणे अनिवार्य आहे.

केनियामध्ये आंदोलकांची जाळपोळ
सरकारच्या प्रस्तावित करवाढीविरोधात केनिया येथे हिंसक निदर्शने सुरू आहेत. नैरोबी येथील हिंसाचारात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून 150 हून अधिक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान सरकारने केनियातील आपल्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. केनियाच्या संसदेत मंगळवारी हजारो लोक घुसले. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडया पह्डल्या. नंतर गोळीबार केला. आंदोलकांनी त्याचदरम्यान संसदेचा काही भाग पेटवून दिला. केनियाचे राष्ट्रपती विलियम रूटो यांनी मंगळवारी हिंसा आणि अराजकता पसरवण्याविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले.

हिंदुस्थानी दाम्पत्याला अमेरिकेत शिक्षा
अमेरिकेतील न्यायालयाने एका हिंदुस्थानी दाम्पत्याला कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या दाम्पत्याने शाळेत प्रवेश घेण्याचे आश्वासन देऊन आपल्या एका नातेवाईकाला अमेरिकेत बोलावून घेतले होते. मात्र या दाम्पत्याने या नातेवाईकाला स्वतःच्या खासगी कामांना जुंपले. आरोपींची नावे हरमनप्रीत सिंह (31) आणि कुलबीर कौर (43) अशी असून हरमनप्रीतला 135 महिने तर कुलबीर कौरला 87 महिन्यांनी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सामानाची चोरी; रेल्वेला लाखाचा दंड
दिल्लीतील एका महिलेचे मौल्यवान सामान काही वर्षांपूर्वी रेल्वे प्रवासादरम्यान चोरीला गेले होते. याची नुकसान भरपाई म्हणून रेल्वेला 1 लाख 8 हजार रुपये या महिलेला द्यावे लागणार आहेत. जिल्हा ग्राहक वादविवाद निवारण आयोगाने संबंधित रेल्वे अधिकाऱयांना नुकसानभरपाईची रक्कम अदा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रवासादरम्यान आरक्षित डब्यात काही प्रवासी आरक्षण नसतानासुद्धा प्रवास करीत होते. या दरम्यान या महिलेकडील 80 हजार रुपयांचे सामान चोरीला गेले होते.

मार्क रुटे नाटोचे नवे महासचिव
ब्रुसेल्समध्ये नाटोच्या 32 सदस्यांनी बुधवारी नीदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांना नाटोचे नवे महासचिव म्हणून नियुक्त केले. रुटे हे 1 ऑक्टोबरला सध्याचे महासचिव जेन्स स्टोलटेनबर्ग यांच्याकडून पदभार स्वीकारतील. मार्क रुटे यांच्या नियुक्तीच्या घोषणेनंतर स्टोलटेनबर्ग यांनी सोशल मीडियावरून त्यांचे अभिनंदन केले. मार्क रुटे यांची नियुक्ती अशावेळी करण्यात आली. यावेळी रशिया युव्रेन वर आक्रमन करत आहे.

येस बँकेत कर्मचारी कपात
येस बँकेत मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी कपात सुरू आहे. येस बँक आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करीत असून त्याचबरोबर सध्या 500 कर्मचाऱयांना कमी करण्यात आले आहे. यापुढेही आणखी कर्मचारी कपातीची शक्यता आहे. या कर्मचारी कपातीचा सर्वाधिक फटका बँकेच्या विविध शाखांना बसला आहे. तसेच रिटेल, होलसेलसारख्या विभागातील कर्मचारी कपात करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱयांना नोकरीवरून कमी केले आहे त्यांना तीन महिन्यांचा पगार आगाऊ देण्यात आला आहे.

सरकारने नियम बदलताच हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची कॅनडाकडे पाठ
पॅनडा सरकारने नुकतेच व्यवसाय परवाना आणि विजासंबंधी नियमांत बदल केला आहे. त्यातच कॅनडामध्ये रोजगाराचे फारसे पर्याय देखील उपलब्ध होत नसल्याने हिंदुस्थानी विद्यार्थ्यांनी आता कॅनडाकडे पाठ फिरवली आहे. कॅनडातील टडो सरकारने नवा नियम बनविला असून त्यानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी कॅनडात पोस्ट ग्रॅज्युएट व्यवसाय परवानासाठी अर्ज करू शकत नाहीत. कॅनडातील परदेशी विद्यार्थ्यांमध्ये हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यातही कॅनडामध्ये जाण्यासाठी पंजाबी विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात उत्सुक असतात. कॅनडा सरकारच्या वतीने सांगण्यात आले की, व्यवसाय परवाना सध्या तरी विशेष श्रेणीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. मात्र इमिग्रेशन एजंटच्या म्हणण्यानुसार केवळ पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांसाठीही नाही तर सामान्यांनादेखील बसणार आहे.

तापमानामुळे अब्राहम लिंकन यांचा मेणाचा पुतळा वितळला 

देशभरात उष्णतेचा कहर सुरूच आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण आहेत. अशातच पुतळ्यांनाही मोठा फटका बसत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा मेणाचा पुतळा वॉशिंग्टन डीसी येथे आहे. सहा फूट उंच असा हा पुतळा वॉशिंग्टन डीसी येथील उष्णतेमुळे वितळला. त्यामुळे पुतळ्याचा आकार अत्यंत दयनीय झाला. वॉशिंग्टन डीसी येथील एका प्राथमिक शाळेबाहेर अब्राहम लिंकन यांचा मेणाचा पुतळा आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात नॉर्थवेस्ट वॉशिंग्टन येथील शाळेच्या परिसराबाहेर हा वॅक्स स्टॅच्यू उभारण्यात आला. उष्णतेमुळे पुतळ्याचे डोके आणि पायाचा भाग वितळला आहे. हा भाग अक्षरशः खाली गळून पडला आहे. वॉशिंग्टन डीसी येथे शनिवारी 39 डिग्री तापमानाची नोंद झाली. त्यामुळे पुतळ्याचे मेण वितळले. अब्राहम लिंकन यांचा हा पुतळा आर्टिस्ट सँडी विलियम्य यांनी साकारलाय. सध्या हा त्या जागेवरून हलवण्यात आला आहे.