बांगलादेशात सातत्याने हिंदूंवर अत्याचार होत असून आता इस्कॉनशी जोडलेल्या लोकांनाही लक्ष्य केले जात आहे. बांगलादेशमध्ये हिंदू नेते आणि इस्कॉनचे माजी सदस्य चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर इस्कॉनच्या अनुयायांवर सातत्याने हल्ले होत आहेत. त्यात भगवे वस्त्र आणि कपाळावर टिळा लावल्याने या अनुयायांना सहज ओळखता येते. अशावेळी सुरक्षेच्या दृष्टीने कोलकाताच्या इस्कॉनने आपल्या अनुयायांना भगवे वस्त्र आणि कपाळाला टिळा लावण्याचे टाळावे असा सल्ला दिला आहे.
बांगलादेशातील सध्याची तणावग्रस्त परिस्थिती पाहता संघर्ष टाळण्यासाठी लोकांनी भगव्या रंगाचे कपडे घालणे टाळावे, तुळशीची जपमाळ लपवावी, टिळक पुसावे आणि डोके झाकावे, असे इस्कॉन कोलकात्याने आपल्या अनुयानांना सल्ला दिला आहे. मंदिर आणि घरांमध्येच आपल्या धर्माचे पालन करा. बाहेर निघताना सावधता बाळगा. मी सर्व संत आणि सदस्यांना सल्ला देतो की, संकटाच्या या काळात सावध राहा. भगवे कपडे आणि कपाळावर टिळा लावणे टाळा असा सल्ला दिला असल्याचे इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास म्हणाले. पुढे ते म्हणाले, जर भगवा धागा घालण्याची इच्छा असेल तर तो धागा कपड्यांच्या आत लपवावे. तो धागा गळ्यात दिसू नये. शक्य असल्यास तुमचे डोकेही झाका, शक्य तो सर्व प्रयत्न करा ज्याने तुम्ही साधू असल्याचे ओळखता येणार नाही असा सल्ला दिला.
दास म्हणाले की, गेल्या आठवड्यात अनेक संत आणि इस्कॉन सदस्यांना सर्वांसमोर धमक्या देण्यात आल्या. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. इस्कॉनच्या सुमारे 63 संतांना बांगलादेश इमिग्रेशनने शनिवार-रविवारी हिंदुस्थानात येण्यापासून रोखले. त्या सर्वांनी भगवी वस्त्रे परिधान केली होती.
बांगलादेशमध्ये हिंदू नेते आणि इस्कॉनचे माजी सदस्य चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर इस्कॉनच्या अनुयायांवर सातत्याने हल्ले होत आहेत. त्यांना औषध देण्यासाठी गेलेल्या त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.