वर्षभरानंतर इशानला उघडले हिंदुस्थानी संघाचे द्वार, ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध भिडण्यासाठी हिंदुस्थान अ संघात निवड

प्रदीर्घ कालावधीनंतर यष्टिरक्षक इशान किशनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने हिंदुस्थान अ संघाची घोषणा केली असून या संघात इशानला संधी देण्यात आली आहे. हिंदुस्थान अ संघ ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध 31 ऑक्टोबरपासून दोन प्रथम श्रेणी सामने खेळणार आहे. या सामन्यांसाठी इशान ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे.

टीम इंडिया ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध 31 ऑक्टोबरपासून दोन प्रथम श्रेणी (चार दिवसीय) सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दोन सामन्यांनंतर टीम इंडिया आपल्या वरिष्ठ संघाविरुद्ध एक सामना खेळणार आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर वरिष्ठ संघातून बाहेर फेकल्या गेलेल्या इशान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये दिसणार आहे. त्यामुळे इशानच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष गाललेले आहे.

‘‘हिंदुस्थान विरुद्ध ऑस्ट्रेलिया वेळापत्रक

पहिला सामना 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर,

दुसरा सामना 7 ते 10 नोव्हेंबर, (मेलबर्न),

हिंदुस्थान विरुद्ध वरिष्ठ हिंदुस्थान संघ 15 ते 17 नोव्हेंबर (पर्थ).

n हिंदुस्थानचा संघ ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, बाबा इंद्रजीत, इशान किशन, अभिषेक पोरेल, मुकेश कुमार, खलिल अहमद, यश दयाल, नवदीप सैनी, मानव सुतार, तनुष कोटियन.