कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडेल, इराण हल्ल्याच्या तयारीत

इराणकडून कोणत्याही क्षणी इस्त्रायलवर हल्ला केला जाण्याची भीती व्यक्त होत असतानाच आज धक्कादायक वळण लागले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या कमांडोजनी होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इस्त्रायलचे खासगी मालवाहू जहाज पकडले आणि कब्जा केला. हे मालवाहू जहाज हिंदुस्थानच्या दिशेने येत होते. जहाजावर 17 हिंदुस्थानी क्रू मेंबर्स आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने या 17 जणांची सुटका करण्यासाठी इराण सरकारशी संपर्क केला आहे.

‘एमएमसी ऑरिस’ हे जहाज लंडनमधील झोडियाक मेरिटाईम या कंपनीचे आहे. ही कंपनी इस्त्रायलचे अब्जाधीश उद्योगपती इयाल ओफेर यांच्या मालकीची आहे. इराणकडून युद्धाची तयारी करण्यात आली असून, कोणत्याही क्षणी इस्त्रायलवर हल्ला केला जाण्याची भीती आहे. त्यामुळे मध्यपूर्वमध्ये आणखी एका युद्धाचा भडका उडाला आणि अवघ्या जगाला परिणाम भोगावे लागतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही इराण-इस्त्रायल युद्धाची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने एक अॅडव्हायजरी जारी केली असून, हिंदुस्थानी नागरिकांनी इराण, इस्त्रायलचा प्रवास करू नये, अशा सूचना दिल्या.

गेल्या महिन्यात सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये इस्त्रायलने इराणी वाणिज्य दुतावासावर हल्ला केला. त्यात इराण सैन्याच्या एका जनरलसह 12 अधिकाऱयांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर इराणमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. इस्त्रायलला धडा शिकवू, आम्ही बदला घेऊ, असा इशारा इराणने दिला होता. गेल्या आठवडय़ात इराणचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद जमशीदी यांनीही इस्त्र्ाायलवर हल्ला करू. यामध्ये अमेरिकेने कोणताही इस्तक्षेप करू नये; अन्यथा अमेरिकेलाही गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता.

समुद्रमार्गे हल्ला; युद्धनौका, लढाऊ विमाने, क्रूज मिसाईल, ड्रोन तैनात

– इराणकडून इस्त्रायलवर कोणत्याही क्षणी 48 तासांच्या आत हल्ला होऊ शकतो. त्यासाठीची तयारी सुरू केली आहे. z पर्शियन गल्फ आणि रेड सी (लाल समुद्र) येथे युद्धनौका तैनात केल्या असून, त्यावर लढाऊ विमाने, क्रूज मिसाईल तैनात केल्या आहेत. तसेच यूएवी लॉन्च करण्याची क्षमता आहे. z इराणी सैन्याचे कमांडो समुद्रीमार्गे इस्त्र्ाायलवर हल्ला करू शकतात. इस्त्र्ाायलच्या सैन्यतळावर ड्रोन हल्ला होऊ शकतो.

हेलिकॉप्टरमधून कमांडोज उतरले

होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणचे निमलष्करी दल ‘रिव्होल्युशनरी गार्ड’च्या कमांडोजने ही कारवाई केली. हे कमांडोज हेलिकॉप्टरमधून जहाजावर उतरले आणि कब्जा केला. जहाजावर 25 क्रुमेंबर्स असून, त्यात 17 हिंदुस्थानी आहेत. ज्या होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणने जहाज पकडले ते पर्शियन आखाताचे मुख्य समजले जाते. येथूनच जगातील तेलाचा व्यापार चालतो.

हिंदुस्थानने जारी केली नागरिकांसाठी अॅडव्हायजरी

केंद्र सरकारने हिंदुस्थानी नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली असून, पुढील सूचना मिळेपर्यंत इराण आणि इस्त्रायलचा प्रवास करू नये, अशा सूचना आपल्या नागरिकांना दिल्या आहेत.

न्हावा शेवाकडे जहाज येत होते

मालवाहक जहाज संयुक्त अरब अमीरातच्या खलिफा बंदरावरून हिंदुस्थानकडे निघाले होते, असे वृत्त आहे. मुंबईतील न्हावा शेवा येथील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट येथे हे जहाज येत होते. जहाजावर मोठे पंटेनर्स आहेत. दरम्यान, हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराण सरकारशी संपर्क साधला असून, जहाजावरील आपल्या 17 क्रू मेंबर्सची सुटका करावी, अशी मागणी केली आहे.