पत्नीचा कर्करोगाने मृत्यू, विरहातून IPS अधिकाऱ्याने ICUमध्येच स्वत:ला संपवलं

पत्नीच्या मृत्यूनंतर एका आयपीएस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची हदयद्रावक घटना समोर आली आहे, आसामचे डीजीपी जीपी सिंह यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहीले की, ‘ही अतिशय दुर्देवी घटना आहे. आसामचे गृह आणि राजकीय सचिव शिलादित्य चेतिया यांनी मंगळवारी संध्याकाळी आत्महत्या केली.

शिलादित्य चेतिया हे 2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. दीर्घकाळ कॅन्सरशी झुंज देत असलेल्या पत्नीच्या निधनानंतर काही मिनिटांनी त्यांनी हे पाऊल उचलले. मंगळवारी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संपूर्ण आसाम पोलीस कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएस अधिकारी चेतिया यांच्या पत्नीचा जिथे मृत्यू झाला होता. त्या आयसीयूमध्येच आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या सरकारी बंदुकीने स्वत:वर गोळी झाडली.  चेतिया यांची राज्याचे गृह सचिव म्हणून पोस्टिंग करण्यापूर्वी तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (एसपी) होते. आसाम पोलिसांच्या चौथ्या बटालियनचे कमांडंट म्हणून त्यांनी काम केले होते.