गेल्या वर्षी कुछ तो गडबड है, असे साऱयांनाच पदोपदी जाणवत होते. मुंबई इंडियन्स कामगिरीतही ते दिसले आणि हा तगडा संघ साखळीतच बाद झाला. त्यानंतर संघांत खूप बदल होण्याचे संकेत मिळत होते, पण आयपीएलच्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्समध्ये सारेकाही चांगलं असल्याचे संकेत देत ‘मुंबईचा राजा’ असा लौकिक असलेला रोहित शर्माला संघात कायम ठेवण्यात आले असून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा, अष्टपैलू हार्दिक पंडय़ा, तडाखेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव व डावखुरा तिलक वर्मा यांनाही कायम राखले आहे. मात्र यंदाच्या रिटेन्शनमधील सर्वाधिक धक्कादायक वृत्त म्हणजे ऋषभ पंत, श्रेयस अय्यर हे खेळाडू यंदा लिलावाच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे यांच्यावर कितीची बोली लागते याकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे.
पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्येही एप्रिल-मे महिन्यात आयपीएलच्या मनोरंजनाचा हंगाम पार पडणार आहे. त्यासाठी नोव्हेंबर ते डिसेंबरच्या काळात खेळाडूंची लिलाव प्रक्रिया होते. त्यातच यावेळी मेगा-ऑक्शन होणार असल्याने प्रत्येक संघाला पाच खेळाडू संघात कायम राखण्याची व अन्य एका खेळाडूसाठी ‘राइट टू मॅच’ कार्ड वापरण्याची मुभा देण्यात आली होती. 31 ऑक्टोबर रोजी ही मुदत संपल्याने सर्व 10 संघांनी आपाल्या संघात कायम राखलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली.
रोहितच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने जूनमध्ये टी-20 विश्वचषक उंचावला. मात्र विश्वचषकापूर्वीच झालेल्या आयपीएलमध्ये रोहितकडून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हिसकावून घेत हार्दिककडे सोपवण्यात आले होते. परिणामी हार्दिकचाही खेळ खालावला व मुंबईला गुणतालिकेत तळाच्या दहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. त्यामुळे रोहित पुढील हंगामात मुंबईला सोडचिठ्ठी देणार असल्याची अफवा सगळीकडे पसरली होती. त्यासंदर्भात रोहितचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झालेला. मात्र प्रशिक्षक महेला जयर्वधेनेला पुन्हा आणून मुंबईने त्यांचा ‘कोर ग्रुप’ (मुख्य खेळाडूंचा संच) कायम राखण्याचे संकेत दिले.
क्लासन रिटेनमधील महागडा खेळाडू
सनरायझर्स हैदराबादने हेन्रिच क्लासनला 23 कोटी रुपयांत रिटेन केले. तोच सध्या रिटेन केलेल्या खेळाडूंमधील सर्वाधिक महागडा खेळाडू आहे. दरम्यान, विराट कोहलीला बंगळुरूने 21 कोटींमध्ये संघात कायम राखले. रोहित 2011 पासून मुंबईचा भाग असून त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा आयपीएल जिंकली आहे. तसेच कर्णधार म्हणून हार्दिकलाच कायम ठेवण्यात आले आहे. बुमराला मुंबईने सर्वाधिक 18 कोटींमध्ये रिटेन केले. त्यानंतर हार्दिक व सूर्यकुमार यांना प्रत्येकी 16.35 कोटींमध्ये संघात कायम राखले. रोहितला 16.30 कोटी देण्यात येतील. तर पाचवा रिटेन्शन म्हणून तिलक वर्माला मुंबईने आठ कोटींमध्ये संघात कायम राखले.
दरम्यान, विराट कोहलीला बंगळुरूने 21 कोटींमध्ये संघात कायम राखले. गतवर्षी कोलकाताला जेतेपद मिळवून देणारा कर्णधार श्रेयस यंदा लिलावात दिसेल. तसेच दिल्लीने पंतला, तर लखनऊने के. एल. राहुलला संघातून काढले आहे. त्यामुळे लिलावाची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे. मोहम्मद शमी, मिचेल स्टार्क, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट असे आघाडीचे गोलंदाजही यावेळी लिलावाच्या रिंगणात उतरतील.
तीन कर्णधारांना डच्चू
दिल्ली पॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत, कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर व लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार लोकेश राहुल यांना त्यांच्या संघमालकांनी रिलीज करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता हे तिन्ही कर्णधार आयपीएलच्या आगामी लिलावात असतील. त्यामुळे लिलावाची उत्सुकता टिपेला पोहोचलेली असेल. मोहम्मद शमी, मिचेल स्टार्क, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट असे आघाडीचे गोलंदाजही यावेळी लिलावाच्या रिंगणात असतील.
कायम राखलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंडय़ा,सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा.
चेन्नई सुपर किंग्ज ः महेंद्रसिंह धोनी, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जाडेजा, मथीशा पथिराना, शिवम दुबे.
राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन, यशस्वी जैसवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ः विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल.
कोलकाता नाइट रायडर्स ः रिंकू सिंग, सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसल, हर्षित राणा, रमणदीप सिंग.
सनरायझर्स हैदराबाद ः हेन्रीच क्लासन, पॅट कमिन्स, ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी.
गुजरात टायटन्स ः राशीद खान, शुबमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान.
लखनऊ सुपर जायंट्स ः निकोलस पूरन, मयांक यादव, रवी बिश्नोई, मोहसिन खान, आयुष बदोनी.
पंजाब किंग्ज ः शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग.
दिल्ली पॅपिटल्स ः अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल.