IPL 2024 – हैदराबाद विजयी; शशांक-आशुतोषची खेळी व्यर्थ

6 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज असताना जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार आशुतोष शर्माने घेतला. मात्र अटीतटीच्या लढतीत शशांक आणि आशुतोष शर्मा ही जोडी पंजाबला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत पराभवातल अंतर शशांक सिंगने कमी केले आणि अवघ्या 2 धावांनी हैदराबादने पंजाबचा पराभव केला.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय शिखर धवनने घेतला होता. नितीश रेड्डीने 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 67 धावांची आक्रमक खेळी केली. हेड (21), अभिषेक शर्मा (16), त्रिपाठी (11), अब्दुल समद (25), शाहबाज अहमद (14) यांच्या खेळीचा हातभार आणि नितेशने केलेल्या फटकेबाजीमुळे हैदराबादने पंजाबला विजयासाठी 181 धावांचा आव्हान दिले होते. पंजाबकडून अर्शदिप सिंगने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर हैदराबादने बाजी मारत पंजाबचा दोन धावांनी पराभाव केला. शशांक सिंग (25 चेंडू 46 धावा) त्याला आशुतोष शर्माने (15 चेंडू 33 धावा) खंबीर साथ दिली मात्र विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.