दिवाळीत शेअर ट्रेडिंगच्या मुहूर्तावर गुंतवणूकदारांची चांदी झाली. परंतु दिवाळीच्या सुट्टीनंतर मात्र पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे साडेपाच लाख कोटी बुडाल्याचे समोर आले आहे. आज शेअर बाजार नियमित वेळेत सुरू झाला. मात्र बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण दिसली. सकाळी 9 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास सेन्सेक्स 860 अंकांनी घसरून 78,864.57 वर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 273 अंकांनी घसरून 24,031 वर बंद झाला.
बँकिंग फायनान्स आणि आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक आणि फेडरल रिझर्व्हच्या बैठकीमुळे ही घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. सेन्सेक्समध्ये 1.8 टक्क्यांची घसरण झाल्यामुळे त्यावर सूचीबद्ध असलेल्या पंपन्यांचे मार्पेट पॅपिटल 5.56 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.
या कंपन्यांना मोठा फटका
रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्पहसिस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, सन फार्मा 420 अंकांच्या घसरणीसह खूपच खाली राहिले. एल अँड टी, ऑक्सिस बँक, टीसीएस आणि टाटा मोटर्सचीही मोठय़ा प्रमाणावर घसरण झाली.
अमेरिकेतील निवडणुकीचे पडसाद
अमेरिकेत 5 नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. डेमोव्रेटिक पक्षाच्या नेत्या आणि विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस विरुद्ध रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरस आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण असून त्याचेच पडसाद शेअर बाजारावर उमटले आहेत.
– मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 25 शेअर्स घसरले. केवळ चार शेअर्समध्ये वाढ दिसली, तर एका शेअरची स्थिती जैसे थी आहे.
– महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.39 टक्क्यांची वाढ झाली, तर सन फार्माच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांची घसरण झाली. देशातील सर्वात मोठी पंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्सही 2.64 टक्क्यांनी घसरले.