मधुमेहावर आंतरराष्ट्रीय परिषद

लाईफनेस सायन्स इन्स्टिटय़ूटतर्फे मधुमेहपूर्व स्थिती ते मुधमेह या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात सुरू आहे. मुधमेहपूर्व टप्प्यातील प्रचलन व प्रतिबंधात्मक उपाय अधोरेखित करण्याचे या परिषदेमागील उद्देश आहे. मधुमेहपूर्व स्थिती ही गंभीर आरोग्यविषयक अवस्था आहे. यावेळी फ्युचर व्हर्सिटी एज्युकेशन ग्रुप आणि लाईफनेस सायन्स इन्स्टिटय़ूटचे संचालक गोपाल शर्मा यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेत 25हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तज्ञांची व्याख्याने होणार आहेत.