सागरी परिक्रमासाठी नौदलाच्या दोन ‘दुर्गा’ तारिणीवर स्वार

नौदलाच्या दोन महिला अधिकारी जग जिंकण्यासाठी निघाल्या आहेत. लेफ्टनंट कमांडर दिलना के. आणि रूपा एम. के. यांनी ‘तारिणी’वर स्वार होत सागरी परिक्रमेला सुरुवात केली. नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. दोघी मे 2025 पर्यंत आपली मोहीम फत्ते करून परतणार आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून नौदलाच्या दोन  महिला अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते होते.

आव्हानांनी भरलेली मोहीम

रूपा आणि दिलना यांच्या नौका धोकादायक जलमार्गातून जातील. यामध्ये केप ऑफ लिऊविन, केप हॉर्न आणि केप ऑफ गुड होपजवळील धोकादायक मार्गांचा समावेश आहे. तसेच इंटरनॅशनल डेट लाईन ओलांडून जावे लागेल. या मोहिमेची संकल्पना नौदलाने 2017 मध्ये नाविका सागर परिक्रमेच्या उद्घाटनाने केली होती. त्या वेळी महिलांनी पहिली परिक्रमा केली होती. सागरी परिक्रमा कठीण यात्रा असून  त्यासाठी कौशल्य, शारीरिक फिटनेस आणि सर्तकतेची आवश्यकता आहे, असे नौदलाने सांगितले.

गोव्यातील पणजी शहराजवळील नौदल महासागर नेव्हिएशन

मोड आयएनएस मांडवीवरून या ऐतिहासिक यात्रेला सुरुवात झाली. आयएनएसव्ही तारिणी नौका 17 मीटर लांब आणि 5 मीटर रुंद आहे. दिलना के. आणि रूपा एम. के 21,600 सागरी मैल अंतर आठ महिन्यांत पार करणार आहेत.