पहिल्या टप्प्यात निवडणूक चिन्हांमधूनच अधोरेखित होणार मोदी सरकारची महागाई

नरेंद्र मोदी सरकारच्या काळात महागाईने सर्वसामान्यांचे पंबरडे मोडले. सरकारच्या जाचक धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीतील निवडणूक निशाणी पाहिल्या तर त्यातून मोदी सरकारची महागाईच अधोरेखित होणार आहे. या टप्प्यात स्टोव्ह, गॅस सिलिंडर, पेट्रोल पंप आणि शेतकरी अशा निशाणी आहेत.

मोदी सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले. गॅस सिलिंडरचा भाव मध्यंतरी 100 रुपयांनी कमी केला असला तरी 900 रुपयांचा गॅस सिलिंडर आजही गरीबांच्या आवाक्याबाहेरचाच आहे. परंतु नाईलाजास्तव त्यांना तो घ्यावा लागत आहे. महागाई वाढल्याने स्टोव्हवर काय शिजवणार असा प्रश्न ग्रामीण भागातील गृहिणीला पडला आहे तर नैसर्गिक आपत्तींमुळे किंबहुना त्यानंतर आवश्यक मदत सरकारकडून न मिळाल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे.

…या निशाण्यांचाही समावेश

ऑटोरिक्षा, हेल्मेट, डायमंड, कोट, शिटी, कुलर, शिलाई मशीन, करवत, फळा, रोड रोलर, स्कूल बॅग, बॅटरी, क्रेन, कपाट, सिंह, टीव्ही, बिस्किट, एअरकंडीशनर, पाटी, फळे भरलेले बास्केट, बॅट, बॅट्समन, नारळाचे शेत, फ्रीज, अंगठी, टायर्स, पेनाची नीब.