इंडिगोचे सर्व्हर डाऊन, विमानसेवा ठप्प झाल्याने देशभरात प्रवासी अडकले

indigo

इंडिगो एअरलाईनचे शनिवारी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विमानसेवा ठप्प झाली. यामुळे इंडिगोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. विमानसेवा ठप्प झाल्याने देशभरातील विविध विमानतळांवर प्रवाशी अडकून पडले आहेत. शनिवारी दुपारी 12.30 वाजल्यापासून इंडिगोची सेवा ठप्प झाली आहे.

सर्व्हर डाऊनमुळे केवळ विमानांच्या उड्डाणांवरच नाही तर ग्राऊंड सर्व्हिसवरही त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे प्रवाशांनी डिजीसीएकडे मदतीची याचना केली आहे. दरम्यान सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना नाहक झालेल्या नाहक त्रासाबद्दल एअरलाईनने माफी मागितली आहे.

कंपनीच्या सर्व्हरमध्ये समस्या निर्माण झाल्याने इंडिगोची वेबसाईट आणि बुकिंग सिस्टम बंद आहे. यामुळे प्रवाशांना चेक इन करण्यासाठी जास्त वेळ वाट पहावी लागेल. आमची टीम तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. लवकरच सेवा पूर्ववत करण्यात येईल, असे एअरलाईनकडून सांगण्यात आले.