हिंदुस्थानी नौदलाचा खलाशी जहाजातून बेपत्ता; शोधमोहिम सुरु

हिंदुस्थानी नौदलाचा एक खलाशी 27 फेब्रुवारीपासून नौदलाच्या जहाजातून बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. या खलाशाचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच नौदलाच्या पश्चिम कमांडने आणि हवाई दलाने त्याला शोधण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्याचेही आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साहिल वर्मा असे या खलाशाचे नाव आहे. साहिल 27 फेब्रुवारी, 2024 पासून हिंदुस्थानी नौदलाच्या जहाजातून बेपत्ता आहे. त्यामुळे नौदलाच्या अनेक जहाजांचा आणि विमानांचा वापर करुन साहिल वर्माचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच नौदलाच्या पश्चिम कमांडने ‘X’ वर याबाबात एक पोस्ट देखील केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, ‘या घटनेबाबत नेमकी माहिती अद्याप मिळालेली नाही. याबाबत ‘नेव्हल बोर्ड ऑफ इन्क्वायरी’ला सविस्तर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.’ असे त्यांनी म्हंटले आहे.