तत्काळ लेबनॉन सोडा… हिंदुस्थानी दूतावासाकडून नागरिकांना आवाहन

इस्त्रायल आणि लेबनॉन यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. इस्त्रायलच्या हल्ल्याने लेबनॉन चांगलेच हादरले असून त्या पार्श्वभूमीवर आता लेबनॉनमधील हिंदुस्थानी दूतावासाने आपल्या नागरिकांना लेबनॉन सोडण्याचे आवाहन केले आहे.

याआधी देखील हिंदुस्थानी दूतावासकडून 1 ऑगस्ट 2024 रोजी अशाप्रकारच्या सूचना हिंदुस्थानी नागरिकांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा दूतावासाने हिंदुस्थानी नागरिकांना लेबनॉन सोडण्याचे तसेच तिथे प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. शिवाय दूतावासाकडून सांगण्यात आले की, जी लोकं लेबनॉनमध्ये राहण्याचा निर्णय घेत आहेत, त्यांना सतर्क राहायला हवे, मदतीसाठी हिंदुस्थानी दूतावासाशी संपर्क ठेवावा. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लेबनानमध्ये जवळपास 4 हजार हिंदुस्थानी नागरिक राहतात. त्यापैकी जास्तकरुन बांधकाम, शेती आणि अन्य क्षेत्रात काम करतात.