हिंदुस्थानात 30 देशांच्या हवाई दलाचा युद्धाभ्यास सुरू

हिंदुस्थानी हवाई दलाचा तरंग शक्ती हा हवाई सराव बुधवारपासून तामीळनाडूतील सुलूर येथे सुरू झाला आहे. हिंदुस्थान, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान, यूएई, हंगेरी, जर्मनी, स्पेनसह जवळपास 30 देश सहभागी होणार आहेत. जर्मन हवाई दल भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने युद्ध सराव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा सराव दोन टप्प्यांत केला जाणार आहे. पहिला टप्पा आजपासून 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि युनायटेड किंग्डमचे हवाई दल त्यांची अत्याधुनिक लढाऊ विमाने आणणार आहेत, तर दुसरा टप्पा 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरदरम्यान राजस्थानच्या जोधपूर येथे होणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, ग्रीस, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका या सहा देशांचा समावेश असेल. या सरावाचा उद्देश हिंदुस्थानच्या संरक्षण क्षमतेचे प्रदर्शन करणे आणि युद्ध सरावात सहभागी होणाऱया सैन्यांमधील सहकार्य वाढवणे हा आहे.