यंग इंडियाचे ‘मिशन झिम्बाब्वे’ आजपासून

टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या विजयोत्सव सुरू असतानाच शनिवारपासून हिंदुस्थान आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेला हरारे येथे सुरूवात होत आहे. या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून, या यंग इंडियाच्या नेतृत्वाची धुरा शुभमन गिल याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या या मालिकेतील युवा खेळाडूंच्या खेळाकडे हिंदुस्थानातील प्रत्येक क्रिकेट प्रेमीचे लक्ष लागलेले आहे.