स्मार्टफोन वापरण्यात हिंदुस्थानी पहिल्या स्थानी

हिंदुस्थानात सर्वात जास्त स्मार्टफोन वापरतात. अमेरिका, चीन आणि ब्रिटनसारख्या पुढारलेल्या देशात जितका स्मार्टफोन वापरला जात नाही, त्याहीपेक्षा हिंदुस्थानात स्मार्टफोन वापरला जात असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. रिसर्च फर्म ‘रेडसीअर’च्या माहितीनुसार, हिंदुस्थानी लोक सर्वात जास्त वेगवेगळ्या सोशल मीडियावर ऑक्टिव असतात. सोशल मीडियावर सर्वात जास्त खाते असणाऱयांमध्ये हिंदुस्थानी नागरिक सर्वात पुढे आहेत. हिंदुस्थानी युजर्स रोज किमान 7.3 तास त्यांच्या स्मार्टफोनवर घालवतात. यातील बहुतांश वेळ ते फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍपवर असतात. अमेरिकन युजर्सचा सरासरी स्क्रीन टाइम हा 7.1 असून चीनमधील युजर्संचा स्क्रीन टाइम हा 5.3 तास आहे.

ऑस्ट्रेलियात मुलांच्या सोशल मीडियावर बंदी

ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. यासंबंधीचे विधेयक संसदेने मंजूर केले आहे. या विधेयकाला सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. असे विधेयक मंजूर करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश ठरला आहे.