रुद्र एम-2 क्षेपणास्त्र्ााची चाचणी यशस्वी

हवेतून जमिनीवर मारा करणाऱया रुद्र एम-2 या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र्ााची हिंदुस्थानने बुधवारी ओडिशाच्या किनाऱयाजवळ घेतलेली उड्डाण चाचणी यशस्वी झाल्याचे संरक्षण सूत्रांनी सांगितले. क्षेपणास्त्र्ााचे नियंत्रण आणि मार्गदर्शन प्रणालीसह चाचणीची सर्व उद्दिष्टय़े या उड्डाणाने पूर्ण केली आहेत. सुखोई 30 एमके-1 विमानातून हे क्षेपणास्त्र्ा चाचणीसाठी डागण्यात आले होते. समुद्रातील जहाज तसेच विविध रडार आणि उड्डाणवेधी यंत्रणांद्वारे या क्षेपणास्त्र्ााची कामगिरी तपासून प्रमाणित करण्यात आली आहे, असे अधिकाऱयांनी सांगितले.