Photo- संसद परिसरात इंडिया आघाडीचं आंदोलन

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी काळ्या रंगाचा मास्क घालून संसद परिसरात एन्ट्री घेतली. या मास्कवर मोदी अदानी भाई भाई असे लिहिण्यात आले होते. काँग्रेस नेत्या खासदार प्रियंका गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुढे आणि विरोधी पक्षांतील खासदार मागे अशा पद्धतीने मार्च काढण्यात आला. यादरम्यान, अदानी आणि मोदींविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.