शुभमन गिलने विराटला टाकले मागे, असा विक्रम करणारा ठरला दुसरा युवा कर्णधार

झिम्बाब्वे दोऱ्यासाठी टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी शुभमन गिलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये शांत राहिलेली शुभमनची बॅट तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये तळपळी आणि त्याने 49 चेंडूंमध्ये 66 धावांची अर्धशतकीय खेळी केली. या अर्धशतकाबरोबरच शुभमन गिलने विराटचा एक विक्रम मोडीत काढला असून टी-20 फॉरमेटमध्ये अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा कर्णधार ठरला आहे.

टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 23 धावांनी पराभव केला. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने शानदार खेळी करत 49 चेंडूंमध्ये 66 धावांची अर्धशतकीय खेळी केली. या अर्धशतकामुळे शुभमनने विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला आणि तो अर्धशतक झळकवणारा दुसरा युवा कर्णधार ठरला आहे. विराटने वयाच्या 28 व्या वर्षी कर्णधार असताना श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. या यादीत पहिल्या क्रमांकावर सुरेश रैनाचा समावेश आहे. सुरेश रैनाने कर्णधार असताना वयाच्या 23 व्या वर्षी झिम्बाब्वेविरुद्ध 2010 साली अर्धशतक झळकावले होते.