Ind Vs Nz 1st Test – ऋषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत, मैदान सोडून बाहेर पडावे लागले

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरूमध्ये सुरू झाला आहे. बंगळुरुच्या के एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या फलंदाजी दरम्यान अचानक पंतच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. ज्यानंतर त्याला मैदान सोडून बाहेर परतावे लागले.

न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील 37व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ऋषभ पंत जखमी झाला. यावेळी रवींद्र जडेजा गोलंदाजी करत होता. जडेजाने हा चेंडू डेव्हॉन कॉनवेकडे टाकला होता आणि चेंडू खूप वेगाने फिरला आणि चेंडू थेट पंतच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला लागला. दुखापतीनंतर पंत कळवळला आणि जमिनीवर झोपला. फिजिओला बोलावण्यात आले. दुखापतीमुळे पंत रडताना दिसला आणि नंतर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. त्यानंतर धुव्र जुरेल याने यष्ठीरक्षणाची जबाबदारी स्विकारली.

डिसेंबर 2022मध्ये पंतला कार अपघातात गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. सामन्या दरम्यान पंतचे बाहेर जाणे हिंदुस्थानसाठी चांगली गोष्ट नाही. त्याची दुखापत नेमकी किती गंभीर आहे. याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.