Ind Vs Ban Test Series 2024 – हिंदुस्थानने बांगलादेशवर विजय मिळवताच, रमीझ राजा यांची प्रतिक्रिया चर्चेत

टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत धमाकेदार खेळाचे प्रदर्शन केले. कानपुरमध्ये टीम इंडियाने पावसाच्या व्यत्ययानंतर दमदमार पुनरागन करत टी-20 स्टाईलने दुसरा सामना जिंकला आणि मालिका सुद्धा खिशात घातली. यावरुन पाकिस्तानचा माजी खेळाडू रमीझ राजा यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये झालेली दोन सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाने गाजवली. अनेक विक्रम या मालिकेत झाले. मायदेशी टीम इंडियाचा हा 18 वा मालिका विजय ठरला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम करणारा टीम इंडिया पहिला संघ ठरला आहे. सलग 11 वर्ष टीम इंडियाने मायदेशात खेळताना एकही मालिका गमावलेली नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू रमीझ राजा याने केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

टीम इंडियाने बांगलादेशचा दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव करत मालिकी जिंकली. त्यामुळे रमीझ राझा यांनी टीम इंडियाचे कौतुक केले. ते म्हणाले की, टीम इंडियाने हा सामना अगदी सहज जिंकला. सध्या मायदेशी टीम इंडियाला पराभुत करणे सर्वात कठीण आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया जबरदस्त कामगिरी करत आहे. फक्त घरच्या मैदानावर नाही तर परदेशी सुद्धा टीम इंडिया जिंकत आहे. त्यामुळे टीम इंडियाचा एक दरारा बनला आहे. बांगलादेशने टीम इंडियाला टक्कर देण्याचा प्रयत्न केला, मात्र फक्त काही वेळासाठी. बांगलादेशी संघाकडे एवढे सामर्थ्य नव्हतं की ते 5 दिवस हिंदुस्थानला आव्हान देऊ शकतील, असे रमीझ राझा म्हणाले आहेत.

हिंदुस्थानी क्रिकेट संघाची तुलना करत पाकिस्तान संघाला रमीज राझा यांनी फटकारले आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानचा संघ चांगले प्रदर्शन करून पुन्हा घसरणीला लागतो. एका वेळेनंतर त्यांचे प्रदर्शन खूपच वाईट होत जाते. आमच्या गोलंदाजांना घ्या किंवा फलंदाजांना, अशी अनेक उदाहरणे आहेत. मात्र हिंदुस्थानचा संघ यशस्वी होण्यामागे सर्वात महत्वाचे कारण हे आहे की ते शिकतात आणि त्यामध्ये सातत्य ठेवतात.