टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र या मालिकेसाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणाला संधी मिळणार आणि कोणाला नाही हे उद्या कळणार असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची निवड समिती उद्या संघाची घोषणा करणार आहे.
टीम इंडियाचे खेळाडू Duleep Trophy 2024 मध्ये चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण खेळाडूंची कामगिरी पाहूनच त्यांचा बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी विचार केला जाऊ शकतो. यशस्वी जैसवाल, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएल राहुल आणि ध्रुव जुरेल सारखे अनेक खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र केएल राहुलला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
🚨 Team India’s squad is likely to be announced tomorrow for the BAN Test series.
We might see some surprises 🤝!! pic.twitter.com/iYzCs3WIxC
— Vishal. (@SPORTYVISHAL) September 8, 2024
दुसरिकडे इंडिया ब संघासाठी खेळताना ऋषभ पंतने अर्धशतक झळकावत दमदार कामगिरी केली आहे. ऋषभ पंत इंडिया अ संघाविरुद्ध पहिल्या डावात अपयशी ठरला होता. मात्र दुसऱ्या डावात त्याने 47 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. त्यामुळे त्याला बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी संधी मिळू शकते.
इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर Moeen Ali आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी कर्णधार म्हणून रोहित शर्मा त्यानंतर यशस्वी जैसवाल, शुभमन गिल आणि विराट कोहली यांची नावे फिक्स मानली जात आहेत. तसेच यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत, ऑलराउंडर म्हणून रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी यांची निवड होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांच्या नावांचा सुद्धा विचार होऊ शकतो.