Ind Vs Ban 2nd Test – टीम इंडियाने गाजवला चौथा दिवस; बांगलादेशच्या बत्त्या गुल, उद्याचा दिवस निर्णायक

कानपूर कसोटीमध्ये हिंदुस्थानने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत सामन्यावर पकड निर्माण केली आहे. चौथ्या दिवसा अखेर बांगलादेशच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून त्यांनी 26 धावा करत दोन विकेट गमावल्या आहेत.

पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. मात्र चौथ्या दिवशी टीम इंडियाने त्याची कसर भरुन काढत सामन्यावर पकड निर्माण केली. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना मोमीनुलने केलेल्या 107 धावांच्या जोरावर 233 धावांपर्यत मजल मारली. प्रत्त्युत्तरात टीम इंडियाने विस्फोटक फलंदाजी करत बांगलादेशी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. टीम इंडियाने पहिल्या डावात ताबडतोब फलंदाजी करत 285 धावांवर 52 धावांची आघाडी घेत आपला पहिला डाव घोषित केला.

Ind Vs Ban 2nd Test Match – पावसाने विश्रांती घेताच विराट बरसला! सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडीत

पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल (51 चेंडू 72 धावा), रोहित शर्मा (11 चेंडू 23 धावा), शुभमन गिल (36 चेंडू 39 धावा), विराट कोहली (35 चेंडू 47 धावा) आणि केएल राहुल (43 चेंडू 68 धावा) यांनी आक्रमक फलंदाजी करत टीम इंडियाला 34.4 षटकांमध्ये 285 धावांपर्यंत पोहचवले. बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या तर हसन महमुदने 1 विकेट घेतली.

दोन चेंडू दोन षटकार, 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम करणारा रोहित पहिलाचं

बांगालेदशच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून त्यांनी दिवसा अखेर 2 विकेट गमावत 26 धावा केल्या आहेत. दोन्ही विकेट रविचंद्रन अश्विनने घेतल्या. सलामीला आलेला शादमान इस्लाम (40 चेंडू 7 धावा) आणि मधल्या फळीतील मोमिनुल हक (0 धावा) हे दोघे नाबाद खेळत आहेत. बांगलादेश अजूनही 26 धावांनी पिछाडीवर आहे.