जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी…

बांगलादेशातील महिला सैनिक आता हिजाबमध्ये, लष्कराची कट्टरवाद्यांसमोर शरणागती

बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर संपूर्ण देशात इस्लामीकरण तीव्र झाले आहे. सरकार तर सोडा, आता बांगलादेशाच्या लष्करानेही कट्टरवाद्यांसमोर शरणागती पत्करलेली दिसते. बांगलादेशच्या लष्कराने महिला सैनिकांना हिजाब घालण्याची नुकतीच परवानगी दिली. 2020 साली बांगलादेश लष्करात महिलांचा समावेश करण्यात आला. तेव्हापासून हिजाब घालण्यास मनाई होती. आता कट्टरवाद्यांच्या दबावाखाली लष्कराने हा नियम बदलला.

‘सीआयएसएफ’मध्ये नोकरीची संधी

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी पर्ह्स (सीआयएसएफ) मध्ये का@न्स्टेबल/फायर (पुरुष) च्या एपूण 1,130 पदांसाठी भरती केली जात आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज अधिपृत वेबसाइट https://cisfrectt.cisf.gov.in वर उपलब्ध असून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत करणे आवश्यक आहे.

महिलांवर अत्याचार करणाऱया तालिबानवर कायदेशीर कारवाई

स्त्री-पुरुष भेदभावावरून तालिबानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. पॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि नेदरलँड या चार देशांनी तालिबानला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचण्याचा निर्णय घेतलाय. मात्र यामुळे तालिबानवर कोणताही फरक पडलेला नाही. उलट लिंगभेद आणि मानवी हक्क उल्लंघनाचे आरोप हास्यास्पद असल्याचा दावा आज तालिबानने केला. महिलांविरोधातील सर्व प्रकारच्या भेदभावाचे उच्चाटन करण्यासाठी युएन कन्वेंशन गठीत करण्यात आलेली आहे.

अनुष्काने गाजवला न्यूयॉर्कचा स्टेज

अभिनेत्री, मॉडेल अनुष्का सेनने न्यूयॉर्कचा टाइम्स स्क्वेअर स्टेज नुकताच गाजवला. असा परफॉर्मन्स देणारी अनुष्का ही पहिली हिंदुस्थानी कलावंत आहे. अमेरिकेतील सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स वरून प्रेरित म्युझिम अल्बममधील एका गाण्यावर अनुष्काने डान्स केला. ‘ग्रॅज्युएशन’ dअसे तिच्या गाण्याचे बोल होते. ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता केन लुईसने शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे गाणे तयार केले आहे.

ऑनलाइन गेममध्ये गमावले 15 लाख

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिह्यातील एका हवालदाराने ऑनलाइन गेमिंगमध्ये 15 लाख रुपये गमावले. या हवालदाराचे नाव सूर्य प्रकाश आहे. कर्जबाजारी झालेल्या या हवालदाराने आपल्या सहकाऱयांकडे 500 रुपयांची मदत मागितली आहे.

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये एक कोटी जिंकले

छोटय़ा पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’ला यंदाच्या पर्वाचा पहिला करोडपती विजेता मिळाला आहे. चंद्र प्रकाश हा अवघा 22 वर्षीय तरुण असून तो कश्मीरचा आहे.

आलियाच्या ‘जिगरा’चा ट्रेलर

अभिनेत्री आलिया भट्ट हिचा आगामी चित्रपट जिगराचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट 11 ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया शियाव, शोभिता धुलिपाला, मनोज पाहवा आणि राहुल रवींद्रन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

शिक्षकाने फोडला डोळा

उत्तर प्रदेशातील कौशंबी जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षकाने सहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला छडी फेपून मारल्याने विद्यार्थ्याची दृष्टी गेली आहे. दोन शस्त्रक्रिया करूनही विद्यार्थी डाव्या डोळ्याने पाहू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याच्या आईने या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बीयर बायसेप्सचे यूटय़ूब हॅक

प्रसिद्ध यूटय़ूबर रणवीर अलाहबादीया याचे दोन्ही यूटय़ूब चॅनेल हॅक करण्यात आले. बीयर बायसेप्स या चॅनेलचे नाव बदलून दुसरे करण्यात आले. तसेच त्याच्या पर्सनल चॅनेलचे नावही बदलले गेले. रणवीरचे एकूण सात चॅनल्स असून त्याला तब्बल 12 मिलियन फॉलोअर्स आहेत.

‘स्त्री-2’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर

श्रद्धा कपूर-राजपुमार राव यांची प्रमुख भूमिका असलेला ‘स्त्राr-2’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाने जगभरात 800 कोटी रुपये कमावले आहे.

दिल्लीत धावणार एअर ट्रेन

देशातील पहिली एअर ट्रेन (ऑटोमेटेड पीपल मूव्हर-एपीएम) सेवा दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू केली जाणार आहे. ही सेवा विमानतळावरील तीन टर्मिनलदरम्यान धावणार आहे. ही ट्रेन प्रवाशांना विविध टर्मिनल, पार्ंकग, पॅब पिकअप पॉइंट, हॉटेल आणि मेट्रो स्टेशनपर्यंत धावणार आहे.