ICC Women’s T20 World Cup 2024 – महिला विश्वचषकासाठी ICC ने जारी केले साँग, बोल आहेत…

युएईमध्ये 3 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या महिला विश्वचषकासाठी ICC ने अधिकृत ‘Whatever It Takes’ हे साँग जारी केले आहे. ICC चे जनरल मॅनेजर क्लेअर फर्लाँग यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

Icc Womens T20 World Cup 2024 चा थरार 3 ऑक्टोबर पासून युएईमध्ये सुरू होणार आहे. त्यासाठी सर्व देश कंबर कसून स्पर्धेसाठी तयार झाले आहेत. महिला क्रिकेटला ऐका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी ICC ने जारी केलेलं अधिकृत साँग महत्वाचे ठरणार आहे. तसेच हे साँग भविष्यात येणाऱ्या महिला खेळाडूंसाठी प्रेरणादाई ठरेल असे, ICC चे जनरल मॅनेजर क्लेअर फर्लाँग म्हणाले आहेत. हे गाणं हिंदुस्थानातील पहिले महिलांचे ‘All-girl pop group W.i.s.h’ यांनी गायले आहे.

हे गाणं iCC च्या अधिकृत युट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आले आहे. तसेच या गाण्यामध्ये हिंदुस्थानचे स्टार महिला खेळाडू स्मृती मानधाना आणि जेमिमा रेड्रिग्स यांचा सुद्धा समावेश आहे.