आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीची आत्महत्या

आएएस अधिकारी विकास रस्तोगी व राधिका रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे. विकास रस्तोगी हे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आहेत. लिपी रस्तोगी असे त्या तरुणीचे नाव असून ती 26 वर्षांची होती.

मंत्रालयासमोर असलेल्या सुनीती इमारतीत काही आय़एएस अधिकारी व मंत्री राहतात. या इमारतीत विकास रस्तोगी त्यांच्या कुटुंबासोबत राहत होते. लिपी हिने या इमारतीच्या दहाव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली.