हवाई दलातील महिला अधिकारीने विंग कमांडरवर केला बलात्काराचा आरोप

जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील हवाई दलातील एका महिला फ्लाईंग ऑफिसरने विंग कमांडरवर बलात्काराचा आरोप केला आहे. हे दोन्ही ऑफिसर श्रीनगर येथील हवाई दलात तैनात आहेत.

पीडित महिला अधिकारीने सदर अधिकाऱ्यावर आरोप करताना तो गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता असे म्हटले आहे. 31 डिसेंबर 2023 ला ऑफिसर्स मेसमध्ये पार्टी आयोजित केली होती. त्यावेळी सदर अधिकाऱ्याने आपल्याला गिफ्ट घेऊन यायच्या बहाण्याने त्याच्या खोलीत नेले व तिथे त्यांनी मला ओरल सेक्स करायला भाग पाडले. मी त्यांना नकार देत होते. त्यानंतर मी त्यांना ढकलून तिथून पळून गेले. त्यानंतर ते मला अनेकदा भेटले पण त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता.

मी माझ्यासोबत घडलेला प्रकार माझ्यासोबतच्या दोन महिला अधिकाऱ्यांना सांगितला त्यानंतर त्यांनी त्याबाबत मला तक्रार दाखल करायला सांगितली. त्यानंतर जानेवारी 2024 ला मी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणात एक तपास समिती स्थापन करण्यात आली. मला व त्या अधिकाऱ्याला समोरा समोर बसवून प्रश्न विचारण्यात आले. मी त्यावरआक्षेप घेतल्यानंतर ते प्रकरण दाबण्यात आले. दोन महिन्यानंतकर मी या प्रकरणी नव्याने तक्रार दाखल केली. या दरम्यान अनेकदा मी रजेसाठी अर्ज केला. मात्र मला रजा देण्यात आली नाही. आरोपीला मदत होईल अशा प्रकारचे वरिष्ट अधिकारी वागत होते असा आरोप सदर महिला अधिकाऱ्याने केला आहे.