केस गळणे, केसात कोंडा होणे… यावर एकच रामबाण उपाय, वाचा सविस्तर

देशातील वाढते प्रदूषण आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपले आरोग्य, त्वचा आणि केस या तिन्हींचे नुकसान होते. केसांचे आरोग्य बिघडते ज्यामुळे ते गळू लागतात. केस गळण्यामागे कोंडा हे देखील कारण असू शकते. परंतु या समस्या वेळीच दूर केल्या पाहिजेत. महागड्या उत्पादनांपेक्षा केसांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय केलेले कधीही फायदेशीर ठरते. त्यामुळे जर तुमचे केस गळत असतील तर लवंगाचे पाणी केसांना लावणे फायदेशीर ठरू शकते. जेवणाची चव वाढवणारी लवंग केसांसाठी कशी रामबाण उपाय ठरू शकते हे आपण जाणून घेऊया.

लवंग पाणी कसे कार्य करते?

वाढते प्रदूषण, खराब पोषण यामुळे आपल्या केसांची वाढ मंदावते. केसांना चांगले पोषण आवश्यक असते. लवंगाच्या पाण्यात युजेनॉल असते जे पोषण आणि शक्ती दोन्ही प्रदान करते. हे पाणी लावल्याने केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होते. खर तर केसांमधील बुरशीजन्य संसर्गामुळे केस गळणे सुरू होते आणि त्यावर तुम्ही लवंगाच्या पाण्याने उपचार करू शकता. आयुर्वेद तज्ज्ञ्यांच्य ते डॉ. किरण गुप्ता सांगतात की ज्यांना टाळूवर कोंडा किंवा ऍलर्जीची समस्या आहे त्यांच्यासाठी लवंगाचे पाणी बरे करण्याचे काम करते. उवांची समस्या लहान मुलांमध्ये जास्त आढळते आणि डॉ.च्या मते, लवंगाच्या पाण्याचा वापर करूनही त्या दूर केल्या जाऊ शकतात.

जाणून घ्या लवंगाच्या पाण्याचे फायदे

केसांची योग्य वाढ: लवंग तेलामध्ये केस गळतीविरोधी गुणधर्म असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे केसांची वाढ सुधारण्यासाठी ते प्रभावी आहे.

ऑक्सिडेटिव्ह तणाव: तणाव, प्रदूषण, धुम्रपान आणि अनियमीत झोपेची पद्धत यासारख्या समस्या शरीरात मुक्त रॅडिकल्सचे उत्पादन वाढवतात आणि आपल्याला ऑक्सिडेटिव्ह ताण येऊ लागतो. लवंगात पॉलिफेनॉल आणि इतर अँटिऑक्सिडंट असतात जे केस गळतीशी संबंधित ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात.

केसातील कोंडा कमी करते: लवंगात अँटीफंगल गुणधर्म असतात जे डोक्यात कोंडा होण्यापासून रोखतात. केसांना शॅम्पू करण्यापूर्वी केस आणि टाळूवर लवंगाचे पाणी स्प्रे करा. काही दिवसातच तुम्हाला फरक दिसू लागेल.

उवांवर उपचार: भारतात वर्षानुवर्षे केसांमध्ये झालेल्या उवांवर लवंगासारख्या गोष्टींचा उपचार केला जातो. त्यात असे घटक आहेत जे केसांमधील उवा काढून टाकू शकतात आणि ते पूर्वीसारखे निरोगी बनवू शकतात. लवंगाच्या पाण्याचा वापर केसांच्या काळजीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.