जनतेशी गद्दारी करणाऱ्याला माफी नाही! भाजप आमदार समीर कुणावारांच्या प्रतिमेला मारले जोडे; मेडिकल कॉलेज संघर्ष समिती आक्रमक

>> चेतन वाघमारे

वर्धा जिल्हयातील बहुचर्चित बहुप्रतिक्षित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समुद्रपूर तालुक्यातील जाम येथे मंजूर झाल्यानंतर हिंगणघाट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीच्या वतीने या निकालाचा निषेध करत आमदार समीर कुणावर यांच्या प्रतिमेला चपला मारीत आपला राग व्यक्त केला आहे. हिंगणघाट शहरातील जनता वर्धा जिल्ह्यात मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात व्हावे यासाठी म्हणून मागील अनेक दिवसांपासून आंदोलन करीत होती. हिंगणघाट शहर बंद ठेवण्यापासून तर लोटांगण आंदोलन असे वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन हिंगणघाट शहरात करण्यात आले.

महिला कृती समितीच्या वतीने देखील आंदोलने करण्यात आले. शेवटी वर्धा जिल्ह्यातील मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट मौजा हिंगणघाट येथेच मंजूर झाले. यानंतर हिंगणघाट येथे मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वेळा येथील खाजगी जागेत होण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे गेला असतास, परत हिंगणघाट शहरातील नागरिकांनी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीच्या वतीने याबाबत आंदोलने करण्यात आली व निवेदने देण्यात आली. शेवटी हा खाजगी जागेचा वाद संपुष्टात आला मात्र आता हिंगणघाट शहरात व हिंगणघाट तालुक्यात हे कॉलेज न देता थेट समुद्रपूर तालुक्यातील जाम येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याचं पत्र आल.यामुळें हिंगणघाट तालुक्यात या निर्णयाच्या विरोधात तीव्र असंतोष पसरलेला आहे. आज हिंगणघाट शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौकात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीच्या वतीने आमदार समीर कुनावार यांच्या प्रतिमेला जोडे चपला मारून हा निषेध नोंदविण्यात आला. तसेच या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारी देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीच्या वतीने दाखवण्यात आली आहे.

जाम येथे झाले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर

हिंगणघाट शहरात व तालुक्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर न होता ते जाम येथे मंजूर झाल्यानंतर हिंगणघाट शहरात तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. संघर्ष समितीच्या वतीने या संपूर्ण निर्णयाचा निषेध करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आमदार समीर पुन्हा वर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले आहे.

हिंगणघाट शहरासाठी हा काळा दिवस 

समुद्रपूर तालुक्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. समुद्रपूर तालुक्याला आमचा विरोध नसून वर्धा जिल्ह्यात मंजूर झालेले वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरातच व्हावे यासाठी म्हणून आम्ही विविध आंदोलने केली. सतत 209 दिवस आंदोलन केल्यानंतर शासनाकडून हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेज खेचून आणले. यावेळी समुद्रपूर तालुक्याने देखील हिंगणघाट तालुक्यातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. हा अन्याय हिंगणघाट शहरावर झाला असल्याची भावना जनमानसात रुड होत आहे. हिंगणघाट शहरासाठी हा काळा दिवस आहे.    
वासुदेव पडवे, कार्याध्यक्ष संघर्ष समिती

गुरुवारी रात्री अकरा वाजता जाम येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्याची बातमी ऐकली. ही बातमी ऐकल्यानंतर जणू माझ्या परिवारातीलच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात सर्वत्र शोक पसरलेला आहे. हिंगणघाट शहराबद्दल शैक्षणिक दृष्ट्या व हिंगणघाट शहराच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून हा घाव घालण्यात आला आहे. गुरुवारी आम्ही आमदार समीर कुणावर यांच्या घरी जाऊन हिंगणघाट शहरातच मेडिकल कॉलेज करावे यासाठी भीक मागितली. मात्र हिंगणघाट शहराच्या पदरी निराशा पडली आहे..
सुनील पिंपळकर, अध्यक्ष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समिती