निवडणुकीतील पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी नियंत्रण कक्ष

विधानसभा निवडणुकीत पैशांचा गैरवापर होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेण्यात येत आहे. मुंबई प्राप्तिकर विभागाकडून निवडणुकीतील पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. समाजातील जागृक नागरिकांना पह्न, व्हॉट्सअॅप, टेक्स्ट मेसेज, ई-मेलद्वारे या ठिकाणी तक्रार करता येणार आहे. मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका व्हाव्यात. तसेच निवडणुकीत पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी प्राप्तिकर विभागाने निवडणूक खर्च देखरेख यंत्रणेचा समावेश असलेला नियंत्रण कक्ष मुंबईत स्थापन केला आहे. आदर्श आचारसंहिता लागू असेपर्यंत हा नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. टोल फ्री क्रमांक ः 1800-221-510, व्हॉट्सअॅप किंवा टेक्स्ट मेसेज ः 8976176276/ 8976176776

ई-मेल आयडी ः [email protected] येथे नागरिकांना तक्रार करता येणार आहे.